नमस्कार मित्रांनो,
भारताला मधुमेहाची राजधानी समजले जाते. तरुणांपासून वयोवृद्धांपर्यंत विविध प्रकारच्या वयोगटातील लोक मधुमेहाशी सामना करत आहेत. मधुमेह नियंत्रणात यावे यासाठी आहारातील पथ्य पाणी पाळणे जरुरी असते.
रक्तातील साखर नियंत्रणात नसेल तर आरोग्यावर आणि इतर अवयवांवर त्याचा गंभीर परिणाम होण्याची दाट शक्यता असते. तर मित्रांनो रक्तातील वाढलेली साखर नियंत्रित करायची असेल तर करा हा घरगुती उपाय.
सर्वात आधी तुम्हाला एका टोपात दोन ग्लास पाणी घ्यायचं आहे, नंतर त्या पाण्यात एक चमचा मेथीचे दाणे टाकायचे आहेत. मेथीच्या दाण्यात सोल्युबल आणि इन्सोल्युबल फायबर भरपूर प्रमाणात असतात. मानवी शरीरासाठी असे फायबर अत्यंत महत्वाचे घटक आहेत.
कडीपत्ता
यानंतर दुसरा पदार्थ तुम्हाला कडीपत्ता घ्यायचा आहे. अनेक भाज्यांच्या तडक्या मध्ये कडीपत्ता वापरला जातो तो कडीपत्ता घ्यायचा आहे. रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी कडीपत्ता अत्यंत गुणकारी आहे. 8 ते 10 कडीपत्त्याची पाने घेऊन त्या 2 ग्लास घेतलेल्या पाण्यात टाकायची आहेत.
अद्रक
यानंतर तुम्हाला आल्याचा उपयोग करायचा आहे. रक्तदाब नियंत्रित करून रक्तातील साखर नियंत्रित करण्याचे कार्य अद्रक करत असते.
बॉडी मटाबोयलिझम वाढून पचनक्रिया सुरळीत करण्याचे काम आले करत असते.साधारण एक इंच आले ठेचून त्यात मिसळायचं आहे.
नंतर या मिश्रणात दालचिनी पावडर मिसळायची आहे. दालचिनी पावडर रोगप्रतिकारक शक्ती वाढवतेच सोबतच रक्तातील वाढलेली साखर देखील कमी करते. आपल्याला इथे पाव चमचा एवढी दालचिनी पावडर त्या पाण्यात मिक्स करायची आहे.
2 ग्लास पाण्यात हे सर्व घटक टाकल्यानंतर 5 मिनिट मंद आचेवर उकळून घ्यायचे आहेत. यामधील पाणी थोडे कमी झाल्यावर गॅस बंद करून पाणी कोमट होऊ द्यायचं आहे. पाणी कोमट झाल्यावर एका ग्लास मध्ये गाळणीच्या साहाय्याने गाळून घ्यायचं आहे.
मित्रांनो रोज सकाळी उपाशी पोटी तुम्हाला हा काढा प्यायचा आहे. 7 ते 8 दिवसातच तुम्हाला तुमची शुगर नॉर्मल झाल्याचा अनुभव येईल.
याशिवाय हा काढा तुम्ही नियमित घेतलात तर रक्तदाब देखील नियंत्रणात राहतो. वजन कमी होते, अपचनाची समस्या राहत नाही, डिप्रेशन कमी होते.
मित्रांनो हे उपाय आवडले असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.
अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.
सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही.