तुम्हालाही नाकातील केस कापण्याची सवय आहे का?

आपल्या त्वचेचं, संबंधित अवयवाचे संरक्षणाचे कार्य करत असतात. शरीरावरील केस आपल्या सौंदर्यामध्ये बाधा निर्माण करतात, असा काही जणांना समज असतो. आपल्यापैकी बहुतांश जण शरीरावरील ‘अनावश्यक केस’ असा शब्दप्रयोगही करतात. पण खरेतर हे केस हानिकारक गोष्टींपासून आपल्या अवयवांचे तसंच त्वचेचं संरक्षण करतात, ही महत्त्वाची बाब प्रत्येकाने लक्षात घेणे गरजेचं आहे. व्यक्तिमत्त्व सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी हल्ली हात आणि पायांवरील केस काढले जातात. शरीराची निगा राखणे ही चांगली बाब आहे. पण तुम्हाला नाकातील केस देखील कापण्याची सवय आहे का? मग या सवयीमुळे तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. या समस्या टाळण्यासाठी वेळीच सावध व्हा. वास्तविक नाकाचे केस आपल्या शरीराचे संरक्षण करतात. श्वासोच्छवासाच्या प्रक्रियेद्वारे आपल्या शरीरात धूळ, माती कण आणि दुर्गंध जाण्यापासून रोखणे हे अनुनासिकेतील केसांचे महत्त्वपूर्ण कार्य आहे. नाकातील केसांमुळे चेहऱ्याचे सौंदर्य कमी होत असावं, पण ते कापल्यास आपल्याला मोठ्या नुकसानांचा सामना करावा लागण्याची शक्यता असते. जाणून घेऊया याबाबतची सविस्तर माहिती.(केमिकलयुक्त प्रोडक्टचा वापर टाळा, सकाळी उठल्यानंतर चेहऱ्याची अशी घ्या काळजी)

‘नाक’ आपल्या शरीराचा एक संवेदनशील अवयव आहे. म्हणूनच नाकातील केस कापणे टाळले पाहिजे. नाकातील केसांमुळे तुम्हाला त्रास होत असल्यास ते कापण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांशी सर्वप्रथम संपर्क साधावा आणि योग्य उपचार जाणून घ्यावे.

आपल्या शरीराच्या काही भागांवर असणारे केस खरंतर आपल्या त्वचेचं, संबंधित अवयवाचे संरक्षणाचे कार्य करत असतात. शरीरावरील केस आपल्या सौंदर्यामध्ये बाधा निर्माण करतात, असा काही जणांना समज असतो. आपल्यापैकी बहुतांश जण शरीरावरील ‘अनावश्यक केस’ असा शब्दप्रयोगही करतात. पण खरेतर हे केस हानिकारक गोष्टींपासून आपल्या अवयवांचे तसंच त्वचेचं संरक्षण करतात, ही महत्त्वाची बाब प्रत्येकाने लक्षात घेणे गरजेचं आहे. व्यक्तिमत्त्व सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी हल्ली हात आणि पायांवरील केस काढले जातात. शरीराची निगा राखणे ही चांगली बाब आहे.

पण तुम्हाला नाकातील केस देखील कापण्याची सवय आहे का? मग या सवयीमुळे तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. या समस्या टाळण्यासाठी वेळीच सावध व्हा. वास्तविक नाकाचे केस आपल्या शरीराचे संरक्षण करतात. श्वासोच्छवासाच्या प्रक्रियेद्वारे आपल्या शरीरात धूळ, माती कण आणि दुर्गंध जाण्यापासून रोखणे हे अनुनासिकेतील केसांचे महत्त्वपूर्ण कार्य आहे. नाकातील केसांमुळे चेहऱ्याचे सौंदर्य कमी होत असावं, पण ते कापल्यास आपल्याला मोठ्या नुकसानांचा सामना करावा लागण्याची शक्यता असते. जाणून घेऊया याबाबतची सविस्तर माहिती.

संसर्ग होण्याचा धोका

नाकातील केस चुकीच्या पद्धतीने कापल्यास किंवा खेचून काढल्यास गंभीर संक्रमण होण्याची शक्यता असते. हेअर फॉलिकल खुले झाल्यास बॅक्टेरिया, दुर्गंध, धूळ- मातीचे कण रोमछिद्रांमध्ये जमा होऊ लागतात. यामुळे नाकामध्ये संसर्ग होण्याची धोका वाढू शकतो.

​डेंजर ट्रायअँगलचे नुकसान

आपल्या चेहऱ्याच्या एका भागास वैद्यकीय भाषेत ‘डेंजर ट्रायअँगल’ असे म्हणतात. नाकावरील मध्यभागापासून ते ओठांच्या दोन कोपरापर्यंतच्या भागाचा यामध्ये समावेश असतो. या भागातील रक्तवाहिन्या आणि मज्जातंतू आपल्या मेंदूपर्यंत रक्त वाहून नेण्याचे कार्य करतात. नाकातील केस कापताना एखादी चूक झाल्यास या रक्तवाहिन्या प्रभावित होण्याची शक्यता असते. तसंच यामुळे गंभीर नुकसान देखील होऊ शकते.

​अर्धांगवायूचा धोका

नाकातील केस चुकीच्या पद्धतीने कापले गेल्यास किंवा खेचले गेल्यास रक्तवाहिन्यांद्वारे मेंदूमध्ये संसर्ग होण्याचा धोका असते. अशा परिस्थिती जर शरीराची रोगप्रतिकारक क्षमता कमकुवत असल्यास संक्रमणाचा धोका वाढू शकतो. संसर्गामुळे रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांच्या कार्यामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. यामुळे आपल्या मेंदूवर ताण येऊ शकतो. या समस्येमुळे पक्षाघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता असते.

​मुरुमांचा धोका

जर तुमच्या नाकाच्या आसपास मुरुम येत असल्यास वेळीच आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा. यामुळे संसर्ग वाढू शकतो. मुरुमांची समस्या वाढल्यास काही प्रकरणांमध्ये रक्त गोठण्याची शक्यता असते. ज्यामुळे रक्तवाहिन्यांच्या कार्यप्रणालीमध्ये अडथळे निर्माण होतात. या परिस्थितीस वैद्यकिय भाषेत कॅव्हर्नस सायनस थ्रोम्बोसिस असे म्हणतात. ही स्थिती आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. यामुळे छोट्या- छोट्या गोष्टींकडे कधीही दुर्लक्ष करू नये.

यावरील उपाय काय?

चेहऱ्यासारख्या संवेदनशील भागावरील केस कापण्याची चूक करू नये. तसंच नाकामध्ये धारदार वस्तू देखील टाकू नये. नाकातील केसांमुळे तुम्हाला जास्त प्रमाणात त्रास होत असल्यास आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा. तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसारच यावर उपाय करावेत.

आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्या उद्भवल्यास सर्वप्रथम आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा. त्यांच्या सल्ल्यानुसारच औषधोपचार करावेत. आपल्या आरोग्यास अपाय होतील, अशा गोष्टी करणं टाळावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!