या 3 लोकांच्या चुकूनही कधी पाया पडू नका… आयुष्य होईल बरबाद…

नमस्कार मित्रांनो,

हिंदु धर्म हा जगातील सर्वश्रेष्ठ धर्मांपैकी एक धर्म आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण अनेक परंपरांचे पालन करतो. त्यापैकी चरण स्पर्श, पाया पडणे ही एक अत्यंत महत्त्वाची परंपरा आहे.

चरण स्पर्श म्हणजे आपल्या पेक्षा मोठ्या, वयाने जेष्ठ असणाऱ्या व्यक्तींच्या पाया पडणे. ज्या व्यक्ती वयाने आपल्यापेक्षा, नात्याने आपल्यापेक्षा मोठ्या आहेत अशा व्यक्तींच्या आपण पाया पडतो.

मित्रांनो पाया पडण्याच्या परंपरेमागे अनेक कारणं आहेत. पण 3 व्यक्ती अशाही आहेत की त्यांच्या चुकूनही कधी पाया पडू नये.

या 3 व्यक्तींच्या पाया पडल्याने आपल्याला अनेक गंभीर समस्याना सामोरं जावं लागू शकते. आज आपण या 3 व्यक्ती कोणत्या आहेत हे जाणून घेणार आहोत.

पण त्या अगोदर पाया का पडावं, हिंदू धर्मात शास्त्रात पाया पडणे, चरण स्पर्श करणे याचं काय महत्व आहे ते जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचे आहे.

मित्रांनो जेव्हा आपण आपले आई वडील, आजी आजोबा, संत महात्मे, शिक्षक यांच्या पाया पडतो, तेव्हा आपले हात हे त्यांच्या चरणांना स्पर्श करत असतात. आणि त्यांचे हात आशीर्वाद स्वरूप आपल्या डोक्यावर किंवा पाठीवर किंवा खांद्यावर सुद्धा स्पर्श करत असतात.

मित्रांनो या क्रियेमधून आपल्या वडील व्यक्तींची, संत महात्म्यांची सकारात्मक ऊर्जा, त्यांचे प्रेम, वात्सल्य हे आपल्यामध्ये प्रवाहित होत असते. आणि याच आशीर्वाद स्वरूप सकारात्मक ऊर्जेच्या जोरावर आपण प्रत्येक कामात यश मिळवत असतो.

आपल्या अंगात सकारात्मक ऊर्जेचा संचार झाल्यामुळे आपण जे काही काम करत असू ते आपण सद्सद्विवेक बुद्धीने करत असतो. त्यामुळे आपल्याला प्रत्येक कामात यश प्राप्ती होते.

आणि याच कारणामुळे हिंदू धर्मात, शास्त्रात सकाळी उठल्यानंतर आपल्या जेष्ठांचा आशीर्वाद घेण्यास सांगितला आहे. ज्यामुळे जेष्ठ व्यक्तींचे अनुभव, आशीर्वाद, सकारात्मक ऊर्जा आपल्याला प्राप्त होईल.

आपल्याला माहीत असेल की भगवान श्री कृष्ण यांनी सुद्धा आपला मित्र सुदामा यांचे चरण स्पर्श केलेले होते. त्याच प्रमाणे आज सुद्धा आपण नवरात्री मध्ये कन्या पूजन करतो. कन्या पूजन च्या वेळी पाय धुतले जातात. त्यांची पूजा केली जाते, आणि नंतर चरण स्पर्श केले जातात.

मित्रांनो असं केल्याने आपल्याला नावदुर्गांचे आशीर्वाद प्राप्त होतात असं हिंदू धर्म मानतो.

आता आपण जाणून घेऊया की कोणते 3 लोक आहेत ज्यांच्या कधीही पाया पडू नये.

1) आपले शत्रू

मित्रांनो आजच्या या कलियुगात सर्च लोक काय चांगले नसतात. काही लोकांचं तुमच्या बरोबर शत्रुत्व असतंच. जे लोक तुमचे शत्रू आहेत, ज्यांना तुमची प्रगती बघवत नाही, जे सतत तुमचा द्वेष करतात अशा लोकांच्या कधीही पाया पडू नका.

याचं कारण असं आहे की जे तुमचे शत्रू आहेत त्यांच्यात तुमच्याप्रति सतत नकारात्मक गोष्टी दाटलेल्या असतात. तुमच्या बद्दल सतत नकारात्मक विचार हे लोक करत असतात.

त्यामुळे पाया पडताना ही सर्व नकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवाहित होते आणि त्याचे अत्यंत वाईट परिणाम तुमच्या जीवनावर होतात. तुमची चालू असलेली प्रगती थांबू शकते, चालू असलेली कामं थांबू शकतात. तुमचं मन तुमच्या कामावरून हटू शकतं, कुटुंबात वादविवाद होऊ शकतात.

आणि याच कारणामुळे जे आपले शत्रू आहेत, आपला द्वेष करतात अशा लोकांच्या कधीही पाया पडू नका.

2) अधर्मी, चरित्रहीन आणि पापी लोक

मित्रांनो जगात असे खूप कमी लोक आहे जे धर्मानुसार वागतात. जे लोक अधर्मी आहेत, हिंदू धर्माचे पालन करत नाहीत, चरित्रहीन आहेत, किंवा पापी प्रवुत्तीचे आहेत अशा लोकांच्या सुद्धा पाया पडू नका.

जर तुम्ही अशा लोकांच्या पाया पडलात तर तुम्ही धर्म भ्रष्ट होऊ शकता. तुमच्या हातून अधार्मिक कार्य घडू शकतं. तुम्ही अनै तिक मार्गाने पैसा कमवायला लागाल.

त्यामुळे अशा लोकांच्या कधीही पाया पडू नका.

3) अनोळखी लोक

मित्रांनो अनोळखी लोकांबद्दल आपल्याला माहिती नसते. हे लोक कसे आहेत, धर्मनिष्ठ आहेत की नाही हे आपल्याला माहीत नसतं.

त्यांचं चारित्र्य, वागणूक, दुसऱ्यांच्या प्रति भावना, आपल्या धर्माबद्दल मनात असलेले भाव आपल्याला माहीत नसतात.

त्यामुळे अशा अनोळखी लोकांच्या सुद्धा चुकूनही पाया पडू नका. त्यांच्या पाया पडल्याने त्यांच्यातील कोणत्या प्रकारची ऊर्जा आपल्यात प्रवाहित होईल हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळे त्यांच्या पाया पडणे कटाक्षाने टाळा.

मित्रांनो आपल्यापेक्षा वयाने मोठ्या, नात्याने मोठ्या असलेल्या व्यक्तींना कधीही अपशब्द वापरू नका. त्यांचा कधीही अपमान करू नका. जे लोक त्यांना अपशद्ब बोलतात, त्यांचा अपमान करतात त्यांना जीवनात कधीही यशप्राप्ती होत नाही.

त्यांनी कितीही मेहनत केली तरी त्यांना अपयशच पदरी येत. त्यामुळे आपल्यापेक्षा जेष्ठांचा आदर करावा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाचा चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!