14 जानेवारी मकरसंक्रांत… इथे ठेवा 1 नारळ, घरातून गरिबी होईल दूर…

नमस्कार मित्रानो, श्री स्वामी समर्थ

मित्रांनो वर्षाचा पहिला सण मकरसंक्रांती यावर्षी 14 जानेवारीला येत आहे. तर या दिवशी भरपूर उपाय भरपूर तोड गे केले जातात. भरपूर प्रमाणात सेवा आणि मं त्र जप केला जातो. तर तुम्ही सुद्धा यावर्षी काही उपाय करून तुमचे नशीब बदलू शकता.

तुमच्या पत्रिकेत असलेल्या पी डा समस्या, दो ष या उपायाने तुम्ही दूर करू शकता. तर मित्रानो आज आम्ही तुम्हाला नारळाचा एक असा उपाय सांगणार आहोत जो उपाय तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी केला तर तुमच्या घरातून गरिबी, दारिद्र्य बाहेर निघून जाईल.

मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल सूर्य जेव्हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो त्यालाच मकर संक्रांति असे म्हणतात. तर मित्रानो तुमच्या राशी मध्ये, पत्रिकेमध्ये सुद्धा काही पी डा असतात ज्यामुळे आपल्या आयुष्यात बऱ्याच अडचणी येत राहतात.

त्यामुळे मित्रांनो आपल्याला असे काही उपाय करणे जरुरी असते ज्याने आपल्या आयुष्यात सुख समृद्धी नांदेल. तर मित्रांनो मकरसंक्रांतीच्या दिवशी तुम्हाला एक नारळ अशा ठिकाणी ठेवून हा उपाय करायचा आहे.

यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे. तो नारळ तुम्हाला न सोलता बाजारातून घरी घेऊन यायचा आहे. त्यानंतर त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. नंतर तो नारळ तुम्हाला देवघरात ठेवायचा आहे.

मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी 8 ते 9 च्या दरम्यान आंघोळ झाल्यानंतर तो नारळ तुम्हाला देवघरात ठेवायचा आहे. त्यानंतर त्या नारळाची हळदी, कुंकू, अक्षदा, फुल वाहून पूजा करावी.

पूजा झाल्यानंतर तो नारळ तुम्हाला दोन्ही हातात घेऊन जी इच्छा आहे ती भगवंतापुढे मांडावी. जी संकटे आहेत, ज्या काही समस्या आहेत त्याचे लवकरच नि वारण होउदे अशी देवाकडे मागणी करावी.

सोबतच सूर्यदेवाला सुद्धा आपली संकटे, इच्छा सांगाव्यात. प्रार्थना करून झाल्यावर पुन्हा तो नारळ तुम्हाला देवघरात ठेवायचा आहे. पूर्ण दिवस आणि पूर्ण रात्र तो नारळ देवघरातच राहू द्यावा.

दुसऱ्या दिवशी सकाळी तो नारळ ज्याने पूजा केली अशा व्यक्तीने एखाद्या गरिबाला दान करावा. हे जमत नसेल तर जवळच्या मंदिरात जाऊन हा नारळ द्यावा किंवा वाहत्या पाण्यात सोडावा.

या तिन्ही पैकी कोणताही पर्याय तुम्ही निवडू शकता. तर मित्रांनो नक्की हा उपाय मकर संक्रांतीच्या दिवशी नक्की करा. तुमच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होवो हीच स्वामी चरणी प्रार्थना.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाचा चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!