आयुर्वेदामध्ये जास्वंदीच्या झाडाला नेहमीच औषधी झाडाचा दर्जा देण्यात आला आहे. याच्या मुळापासून ते फुलापर्यंत प्रत्येक गोष्ट ही आजारावरील रामबाण उपाय आहे. दिसायला जास्वंदीचं फुल खूपच सुंदर असतं. हे नेहमी तुम्ही घरात वा अगदी बागेतही पाहिलं आहे. वास्तविक जास्वंदीचं फुल हे लाल रंगाचं असतं पण यामध्ये गुलाबी, पांढरा, पिवळा आणि वांगी हे रंगदेखील पाहायला मिळतात.
जास्वंदीचं वैज्ञानिक नाव हिबिस्कस सब्दरिफा (Hibiscus Sabdariffa) असं आहे. याला हिबिस्कस फ्लॉवर असंही म्हटलं जातं. या फुलामध्ये बऱ्याच तऱ्हेचे पोषक तत्व सापडतात जसे की, कॅल्शियम, लोह, विटामिन सी आणि फायबर. जास्वंदीच्या फुलांचा वापर हा बऱ्याच औषधांमध्येही करण्यात येतो. देवाच्या पूजेसाठी वापरण्यात येणारं हे पवित्र फुल केसांसह त्वचा आणि दैनंदिन वापरातही बऱ्याच समस्यांवरील उपाय आहे आणि अनेक आजारांवर फायदेशीर आहे.
● वजन कमी करणे
वेट लॉससाठी जास्वंदीचा उपयोग चहा म्हणून करण्यात येतो. कारण जास्वंदीच्या चहामध्ये नैसर्गिक फॅट बर्न करणारे गुण असतात. जास्वंदीच्या फुलांमध्ये मोठ्या प्रमाणात अँटी ऑक्सीडंट असतं, जे शरीरातील मेटाबॉलिजम प्रक्रिया सुधारण्यासाठी मदत करतं. तसंच यामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात, जे उच्च रक्तदाब आणि यकृताशी संबंधित समस्यांपासून सुटका होण्यासाठी मदत करतात.
२ कप पाण्यात जास्वंदीची फुलं आणि त्याची सुकी पानं टाकावीत. पाणी उकळवावं. पाणी जेव्हा अर्ध राहतं, तेव्हा हे खाली उतरवून गाळून घ्यावं. त्यानंतर त्यामध्ये लिंबाचा रस आणि काही थेंब मध मिक्स करावा. अशा प्रकारे जास्वंदीचा स्वादिष्ट चहा तयार होतो.
हा चहा दिवसातून २ ते ३ वेळा प्यायल्यास, तुम्हाला स्वतःलाच तुमच्या शरीरामध्ये फरक जाणवेल. तुमच्यासाठी हा चहा बनवणं कठीण असल्यास, तुम्ही कोणत्याही अन्य हर्बल ब्रँडचे हिबिस्कस टी चे पाकिट बाजारातून अथवा ऑनलाईन मागवू शकता.
● त्वचेची काळजी घेण्यासाठी वापर
पूर्वीच्या काळात जास्वंदीचा उपयोग हा सौंदर्यसाधनांची उत्पादनं करण्यासाठी होत होता. चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी जास्वंदी हे कोणत्याही वरदानापेक्षा कमी नाही. बोटोक्स प्लांट म्हणूनदेखील याची ओळख आहे कारण नैसर्गिकरित्या बोटोक्स म्हणून याचा परिणाम होतो. विशेषतः ज्यांना त्वचेशी संबंधित समस्या आहेत, त्यांच्यासाठी जास्वंदी खूपच फायदेशीर आहे.
यामध्ये लोह, विटामिन सी आणि अँटी ऑक्सीडंट हे गुण असतात. याचा वापर पुरळ, पिंपल्स, काळे डाग, सुरकुत्या मिटवण्यासाठी करता येतो.
● असा करावा वापर
जास्वंदीची पानं उकळवून व्यवस्थित मिक्सरमधून वाटून घ्या. त्यानंतर त्यात थोडासा मध घालून हलक्या हातांनी आपल्या चेहऱ्यावर लावा. त्यानंतर १५ ते २० मिनिट्सनंतर थंड पाण्याने चेहरा नीट धुऊन घ्या. असं केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील कोरडेपणा जाऊन चेहऱ्यावर डागविरहित गोरेपणा येईल.
● स्मरणशक्ती वाढवण्यास देखील होऊ शकतो फायदा
जास्वंदीचं सरबत स्मरणशक्ती वाढवण्यासाठी सर्वोत्कृष्ट आहे. विशेषतः मुलांच्या बुद्धीच्या विकासासाठी हे चांगलं आहे. हे हृदय आणि मेंदू दोन्हीसाठी एनर्जी बुस्टर म्हणून काम करतं. तुमच्या वाढत्या वयासह जर स्मरणशक्ती कमी होण्याचा त्रास होत असेल तर जास्वंदीचं सरबत फायदेशीर आहे.
सर्वात पहिले जास्वंदीची ८ ते १० पानं आणि फुलं दोन्ही सुकवून वाटून घ्यावीत त्यानंतर त्याची पावडर करून घ्यावी आणि एअर टाईट डब्यामध्ये ही पावडर ठेवावी. दिवसातून कमीत कमी २ वेळा या पावडरीचं सरबत बनवावं अथवा दुधात घालून प्यावं. तुमची बुद्धी कॉम्प्युटरप्रमाणे काम करायला लागेल.
● इतर आरोग्यदायी फायदे
अमेरिकन हार्ट एसोसिएशनच्या एका संशोधनानुसार, जास्वंदीच्या पानांपासून बनलेला चहा उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराच्या रूग्णांसाठी औषधाचं काम करतो. हा चहा प्यायल्यामुळे हृदयप्रक्रिया सामान्य होते आणि शरीराला अतिशय हलकं वाटतं. तुम्हाला उच्च रक्तदाबाची समस्या असल्यास, दिवसातून कमीत कमी २ वेळा जास्वंदीचा चहा नक्की प्यावा.
अधिकतर महिला रक्ता आणि लोहाच्या कमतरतेमुळे अनिमियाग्रस्त असतात. मात्र तुम्हाला आम्ही सांगू शकतो की, जास्वंदीच्या फुलांनी अनमियासारखे आजार बरे होतात. त्यासाठी एक महिना रोज दुधासह एक चमचा जास्वंदीची पावडर खाणं फायदेशीर ठरू शकतं.
जास्वंदीचा चहा सर्दी, खोकला आणि कफने तुम्ही त्रस्त असल्यास, तुम्हाला या समस्येतून नक्कीच सोडवतो. वास्तविक यामध्ये जास्त प्रमाणात विटामिन सी असल्यामुळे सर्दीसाठी हा चहा चांगला असतो.
जास्वंदीचा चहा आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी योग्य राखण्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. यामधील अस्तित्वात असणारे पोषक तत्व आपल्या धमनीतील नलिकांमध्ये पॅलेक्यू जमवण्यास रोखते. त्यामुळे आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल नैसर्गिकरित्या कमी होते.
बऱ्याचदा उष्णता शरीरामध्ये जास्त झाल्यास, तोंड येतं. असं झालं असल्यास, जास्वंदीची ४ ते ५ पानं चावून खावीत. त्यामुळे लाळ जास्त निर्माण होते आणि पचनशक्तीही वाढते.
● जास्वंदीच्या फुलांच्या वापराचे हे आहेत धोके
गरोदर अर्थात प्रेगनंट असलेल्या महिलांसाठी अथवा ज्या महिलांवर फर्टिलिटी उपचार चालू आहेत अशांसाठी जास्वंदीचा चहा अजिबातच योग्य नाही. त्यांच्यासाठी हा चहा नुकसानदायी ठरू शकतो. कारण यामुळे शरीरातील अॅस्ट्रोजनची पातळी कमी होते आणि त्यामुळे तुमची मासिक पाळी सुरु होऊ शकते. तसंच तुमचागर्भपात होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
तुम्हाला गाडी चालवायची असल्यास, त्याआधी १ तास कोणत्याही प्रकारामध्ये जास्वंदीचं सेवन करू नये. कारण जास्वंदी खाल्ल्यानंतर झोप येते. त्यामुळे ही काळजी घेणं आवश्यक आहे.
कमी रक्तदाब अर्थात लो ब्लड प्रेशर असलेल्या रूग्णांनी जास्वंदीचा चहा कधीही पिऊ नये. यामुळं त्याचं ब्लडप्रेशर अजून कमी होण्याची शक्यता असते. ज्यामुळे त्यांची तब्बेत बिघडूही शकते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.