फक्त 10 मिनिटांत गायब होतील पिंपल्स काळे चे डाग आणि मुरुमाचे खड्डे…

नमस्कार मित्रांनो,

आपल्या चेहऱ्यावर आलेले पिंपल्स गेल्यानंतर चेहऱ्यावर पिंपल्स चे डाग तसेच राहतात. चेहऱ्यावर असलेले हे डाग घालवणं हे मोठं डोकेदुखीचं काम आहे. जोपर्यंत हे डाग आपल्या चेहऱ्यावर असतात तोपर्यंत आपल्या चेहऱ्यावर सुंदरता दिसत नाही. आपल्या सुंदरते मध्ये बाधा आणतात.

आज आपण असेच पिंपल्स चे डाग दूर करण्यासाठी अगदी सोपा आणि घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. हा उपाय आपण ब्यूटी पार्लर मध्ये सुद्धा पाहिला असेल. पण आज आपण आपल्या घरी अगदी सोप्या पद्धतीने करणार आहोत.

मित्रांनो या उपाया मुळे चेहऱ्यावर असलेले कोणत्याही प्रकारचे डाग अगदी काही मिनिटांत निघून जातील. चेहऱ्यावर एक प्रकारचा ग्लो येईल आणि आपल्या चेहऱ्याचा रंग सुद्धा गोरा होईल.

चला तर जाणून घेऊया पिंपल्स डाग दूर करण्याचा घरगुती उपाय.

पिंपल्स चे डाग दूर करण्यासाठी एक अगदी रामबाण आणि फायदेशीर उपाय म्हणजे चंदन पावडर. हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन गोष्टी लागणार आहेत. त्यातील एक गोष्ट म्हणजे चंदन पावडर. हे आपल्याला आयुर्वेदिक दुकानात मिळेल. किंवा हर्बल ब्युटी प्रॉडक्ट मिळणाऱ्या दुकानात सुद्धा मिळेल.

आपल्याला लागणारा दुसरा जो घटक आहे ते म्हणजे गुलाब जल. गुलाब जल आपल्याला कोणत्याही मेडी कल दुकानात मिळून जाईल.

मित्रांनो आता जाणून घेऊया की या दोन्ही वस्तूंचा वापर कसा करायचा.

आपल्याला एका बाऊल मध्ये 2 चमचा चंदन पावडर घ्यायची आहे. त्यानंतर त्याच्यात थोडं थोडं गुलाब जल टाकत रहा. गुलाब जल ने चंदन पावडर ची एक घट्ट सर पेस्ट बनवा. आपण उटणे बनवतो त्याप्रकारे याची पेस्ट बनवा.

अशा प्रकारे आपला चंदनाचा फेसपॅक तयार होईल. तयार झालेली जी पेस्ट आहे ती आपल्याला आपल्या चेहऱ्यावर बोटानी किंवा फेसपॅक लावण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ब्रश ने लावावी. ही पेस्ट लावताना हलक्या हाताने चेहऱ्यावर मालिश करा.

चेहऱ्यावर ही पेस्ट लावल्यानंतर 10 ते 15 मिनीटापर्यंत सुकू द्या. या दरम्यान तोंडाची किंवा चेहऱ्याची हालचाल करू नका. चेहऱ्याच्या स्नायू वर ता ण पडेल असं काम करू नका.

10-15 मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून साफ करून घ्या. याने आपल्याला अनेक फायदे होतील, जसे चेहऱ्यावर एक प्रकारचा फ्रेश नेस येईल. चेहरा एकदम मुलायम होईल. चेहऱ्याला थंडावा मिळेल. यामुळे चेहऱ्यावर असलेले डाग आणि पिंपल मार्क कमी होतील.

चेहऱ्यावर असलेले डाग जाऊन चेहरा निखरेल आणि एक गोरा पणा येईल. मित्रांनो चंदन पावडर ची एक खास गोष्ट ही आहे की चंदन हे सगळ्या प्रकारच्या स्किन वर सूट होतं. याचे कोणतेही साईड इफेक्ट नाही होत.

तुमचा चेहरा तेलकट असेल, ड्राय असेल किंवा सेन्सिटिव्ह असेल. कोणत्याही प्रकारच्या त्वचेवर आपण हा चंदनाचा लेप लावू शकतो. हा उपाय स्त्री आणि पुरुष कोणीही करू शकतं.

मित्रांनो या चंदनाच्या लेपाचा वापर सलग 7 दिवस करा. तुम्हाला याचे चांगले फायदे दिसून येतील. तुम्ही हा उपाय कायमस्वरूपी सुद्धा करू शकता. याचे कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट होत नाहीत त्यामुळे कधीही तुम्ही याचा वापर करू शकता. याच्या वापराने काही दिवसातच तुमच्या चेहऱ्यावर असलेले पिंपल्स चे डाग, खड्डे कायमस्वरूपी निघून जातील.

चंदन मध्ये आपल्या शरीरासाठी उपयुक्त असलेले अनेक गुणधर्म असतात जे आपल्या चेहऱ्या पासून पायापर्यंत सुंदरता वाढवण्यासाठी उपयोगी ठरतात. तुम्ही अनेक वेळा पाहिलं असेल की चंदनाचा उपयोग हा अनेक प्रकारच्या साबण आणि सौंदर्य प्रसाधना मध्ये केला जातो.

अशा प्रकारे आपण ब्युटी पार्लर मध्ये महाग असलेले चंदनाचा फेसपॅक अगदी थोड्या खर्चात घरच्या घरी बनवू शकता.

मित्रांनो हे उपाय आवडले असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!