आचार्य चाणक्य यांनी नीति शास्त्रात मानवी जीवनाशी संबंधित विविध पैलूंवर काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. चाणक्य म्हणतात की मानवाला नेहमी संयम राखूनच काम करावे, पण त्यांनी नीतिशास्त्रात अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यांच्या मध्ये अजिबात संकोच बाळगू नये.
चाणक्य म्हणतात की या कामात संकोच केला तर व्यक्तीला नुकसान होऊ शकते. पण या कामात संकोच न करणारे व्यक्ती यशस्वी होतात. चला तर मग जाणून घेऊ या अशा कोणत्या गोष्टी आहे ज्यांच्या साठी संकोच बाळगू नये.
1 पैशाच्या संबंधित प्रकरणांमध्ये अजिबात संकोच करू नये.
चाणक्य म्हणतात की मनुष्याला पैशाच्या बाबतीत अजिबात संकोच करू नये. जे लोक पैशाचा बाबतीत संकोच करतात त्यांना तोटा होण्याची शक्यता असते. एखाद्याला पैसे उसने दिले असतील तर त्याच्या कडून मागायला संकोच करू नये. तसेच जर आपण व्यवसाय करीत आहात तर त्यामध्ये देखील स्पष्ट राहा अन्यथा पैशाचा तोटा संभवतो.
2 गुरू कडून ज्ञान घेताना देखील संकोच करू नये
चाणक्य नीती म्हणते की गुरू कडून शिक्षण घेताना कधीही लाज बाळगू नये. मनात एखादा प्रश्न पडल्यास किंवा कोणतेही मंत्र किंवा गोष्ट समजत नसेल तर ते त्वरितच विचारावे. केवळ एक जिज्ञासू व्यक्तीच आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळवून ज्ञान प्राप्त करत.
जे लोक शिक्षण घेताना कोणतीही ला ज बाळगतात त्यांना पूर्ण ज्ञान मिळत नाही ज्यामुळे त्या लोकांना आपल्या आयुष्यात बऱ्याच समस्यांना सामोरी जावं लागत.
3 खाण्याच्या बाबतीत संकोच करू नये
चाणक्य म्हणतात की माणसाने जास्त अन्न खाऊ नये.पण जेवताना कोणत्याही प्रकारचे संकोच करू नये.काही लोकांना इतरांच्या समोर जेवायला किंवा कोणाच्या घरी खायला संकोच होतो अशा परिस्थितीत ते उपाशी राहतात.
शरीराला काम करण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते, जी केवळ अन्नाद्वारे मिळते. उपाशी राहून में दूवर नियंत्रण ठेवले जात नाही, त्यामुळे आपण कोणतेही काम व्यवस्थितरीत्या करू शकत नाही. म्हणून जेवण करताना कोणत्याही प्रकारचा संकोच करू नये.
या राशीच्या व्यक्तींनी रागावर नियंत्रण ठेवा !
मेष – एखादं महत्त्वाचं काम करण्याकडे दुर्लक्ष होईल. जुन्या मित्रांची अचानक भेट होईल, त्यांची मदतही होईल. गरज वाटेल तिथे तडजोड करण्यासाठी तयार राहा. व्यवसायात फायदा कमी होईल. बदलीची शक्यता आहे. पैशांबाबतील समस्या राहतील.
वृषभ – नोकरीत पुढे जाण्याची संधी मिळेल. नवीन लोकांशी ओळख होऊ शकते. लोकांना तुमचं बोलणं पटवून देण्यास यशस्वी व्हाल. वेळ तुमच्या बाजूने आहे. व्यवसायात प्रगतीचा योग आहे.
मिथुन – पैशांच्या स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. व्यस्त राहाल. त्यामुळे थकवा जाणवेल. वेळ मिळेल तसा आराम करण्याचा प्रयत्न करा.व्यवसायात वाढ होईल. काही टे न्शन असल्यास आज स मस्या संपतील. समजूतदारपणे काम करा
कर्क – दररोजच्या कामात मन लागणार नाही. काही गोष्टींमुळे दु:खी व्हाल. तुमच्या भावना आणि रागावर नियंत्रण ठेवा. अति उत्साह आणि घाईमुळे कामं बिघडू शकतात. पुढे जाण्यासाठी सतत प्रयत्न करत राहा. एखादं काम करण्यासाठी जितके प्रयत्न कराल तितके यश मिळेल. प्रेम संबंधांसाठी दिवस चांगला आहे.
सिंह – सोबत काम करणाऱ्या लोकांचं सहकार्य मिळेल. पैशांबाबतीत नवीन योजना आखू शकता. कामासाठी प्रवास करावा लागू शकतो. महत्त्वाच्या कामांवर लक्ष द्या. विचार केलेली कामं पूर्ण होऊ शकतात. ऑफिसमध्ये वायफळ वादापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. अधिकारी तुमच्यावर खुश असतील.
कन्या – चांगल्या यशासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. नोकरी बदलण्याचा मूड असल्यास सांभाळून राहा. आज असा प्रयत्न करु नका. छोट्या-मोठ्या भांडणांमुळे मूड खराब होण्याची शक्यता आहे. तुमच्या मनातील गोष्ट कोणाशीही शेअर करु नका. डोकेदुखी होऊ शकते. तब्येतीची काळजी घ्या.
तुळ – व्यवसायात फायद्याचा योग आहे. कामाच्या ठिकाणी लोक तुमच्या बाजूने असतील. अधिक मेहनत घ्यावी लागेल. परंतु दिवस चांगला जाईल. दुसऱ्यांची मदत कराल तर तुम्हालाही फायदा होईल. नवीन योजना आज आखू शकता. कामात सुधारणा होईल. प्रेम संबंधांमध्ये चढ-उतार येऊ शकतात. विवाहितांना जोडीदाराची मदत मिळेल. तब्येतीच्या बाबतीत काळजी घ्या.
वृश्चिक – अधिक मेहनत घ्यावी लागेल. कामाचं टेन्श न वाढू शकतं. जुन्या गोष्टी काढू नका. प्रेम व्यक्त करण्यासाठी संकोच करु नका. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. नोकरी, व्यवसायात तणाव आणि वायफळ खर्च होऊ शकतो. करियरच्या बाबतीत गंभीरतेने प्रयत्न करा. कामात बदल होईल. नवीन काम करण्याचा विचार येऊ शकतो. जोडीदाराकडून तुमच्या भावनांचा सन्मान होईल.
धनु – दिवसभर व्यस्त राहाल. अधिकारी तुमच्या बोलण्याला महत्त्व देतील. अधिक मेहनत केल्यास यश मिळेल. रखडलेला पैसा मिळू शकतो. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. महत्त्वपूर्ण लोकांशी भेट होण्याची शक्यता आहे. तब्येतीत सुधारणा होईल. वैवाहिक जीवन चांगले राहील.
मकर – व्यवसायात मित्रांकडून मदत मिळेल. दररोजच्या कामांसाठी दिवस चांगला आहे. तुमच्या कामात पूर्णपणे यशस्वी व्हाल. रखडलेली कामं पूर्ण करा. जुन्या गोष्टींमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. अविवाहित लोकांसाठी दिवस चांगला आहे. जुन्या गोष्टी विसरुन पुढे जाल तर गोष्टी सुरळित होतील. छोट्या गोष्टींवर राग काढू नका, त्यामुळे गोष्टी बिघडू शकतात.
कुंभ – आळस आणि थकवा जाणवेल. मतभेद होण्याची शक्यता आहे. कामाबद्दल कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नका. जुन्या कामांचा फॉ लोअप घ्या. वैवाहिक लोकांसाठी दिवस चांगला आहे.
मीन – नवीन ऑफिस किंवा दुकान खरेदी करण्याचा विचार कराल. कामासाठी प्रवास करावा लागेल. प्रॉपर्टी खरेदीसाठी योजना आखाल. नोकरदार, व्यावसायिकांनी पुढे जाण्यासाठी एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेतल्यास फायदा होईल. कामात सुधारणा होईल. जोडीदारासोबत प्रेम संबंध चांगले राहतील. कोणत्याही गोष्टीत भावुक होऊ नका