बुधवारी करा हा सोप्पा उपाय घरात होईल धनाचा पाऊस

नमस्कार मित्रांनो ,
आजच्या धकाधकीच्या जीवनात पैसा हा एकमेव असा मार्ग आहे ज्याने मानवी आयुष्यातील ९० टक्के प्रश्न सुटतात… पैसाच सर्व काही नाही हे बोलण्याआधी पुरेसा पैसा कमवणे अवश्यक असते. मित्रानो बऱ्याचदा असे होते कि जेवढी आपण मेहनत करतो त्या मोबदल्यात अपेक्षे पेक्षा कमी पैसा पदरी पडतो. असे का होते ? कधी जाणून घ्यायचा प्रत्यत्न केलाय का ? मेहनत महत्वाची आहेच पण त्या सोबतच नशीब आणि देवांची कृपा तुमच्यावर असणे गरजेचे असते…

त्यासाठी काय केले पाहिजे ते आपण पुढे जाणून घेऊ.

सप्ताहातील बुधवार हा श्री गणेशाचा वार म्हणून सुद्धा ओळखला जातो. श्री गणेशाला दुःखहर्ता आणि मंगलमूर्ती सुद्धा म्हटले जाते. हिंदू धर्मात आद्य पूजेचा मान सर्वात आधी गणपती बाप्पाला दिला जातो… बुधवारी जर श्री गणेशाचे विधिवत व श्रद्धा भावनेने पूजन केले तर सर्व प्रकारच्या ईच्छा व मनोकामनांची पूर्ती होते , तसेच आपल्या कुंडलीत बुद्ध ग्रह अशुभ स्तिथीत असेल तर बुधवारी गणेश पूजन केल्याने तो ग्रह शांत होतो. चला तर मग पाहूया बुधवारी गणेशाला प्रसन्न करण्यासाठी कोण कोणते उपाय करावे.

१) जर तुमच्या घरात निगेटिव्ह ऊर्जा भरली असेल आणि त्यासाठी तुम्ही खूप उपाय सुद्धा केले असतील पण काही फायदा नसेल झाला तर हे करा. बुधवारी श्री गणेशाची पांढऱ्या रंगाची मूर्ती आणावी व तिची स्थापना करावी. असे केल्याने तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाईल आणि ईतर वाईट ऊर्जा , वाईट शक्तींचा तुमच्या घरावर परिणाम होणार नाही. असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाऊन सर्व रखडलेली कामे पूर्ण होण्यास सुरवात होईल.

२) जर कितीही कष्ट करून तुम्हाला तुमचे समाधान होईल इतके उत्पन्न मिळत नसेल तर बुधवारी गणेशाचे विधिवत पूजन करून गुळ व तुपाचा नैवैद्य ठेवावा. पूजन झाल्यावर तो गूळ व तुपाचा नैवेद्य गाईला खायला द्यावा , असे केल्याने तुमच्या उत्पन्नात वाढ होईल.

३) जर तुमच्या घरात नेहमीच वाद विवाद , भांडणे होत असतील ज्यामुळे घरातले वातावरण अशांत होऊन घरात सुख शांती लाभत नसेल तर बुधवारी श्री गणेशाची दुर्वांची मूर्ती बनवावी व ती आपल्या देव्हाऱ्यात स्थापित करावी. आणि दररोज या दुर्वा गणेशाचे विधीवत पूजन करावे. असे केल्याने घरातील वाद विवाद थांबून शांततेचे वातावरण निर्माण होउन घरात सुख शांती लाभेल.

४ ) तुमच्या जीवनात प्रत्येक गोष्टीत अडचणी येत असतील , प्रत्येक कामात अडथळा येत असेल , काही केल्या समस्या पाठ सोडत नसतील तर बुधवारी हत्तीला हिरवा चारा खाऊ घालावा. आणि गणपती मंदिरात जाऊन आपल्या अडचणी गणपती बाप्पाना सांगून त्याचे निवारण होण्यासाठी प्रार्थना करावी. हत्तीला हिरवा चारा देणे सर्वांनाच शक्य नसते त्यामुळे हत्ती ऐवजी गाईला सुद्धा हिरवा चारा देऊ शकता. असे केल्याने तुमच्या अडचणी दूर जाताना तुम्ही स्वतः अनुभवाल.

५ ) बुधवारी सकाळी अंघोळ झाल्या नंतर एका काचेच्या ताटात चंदनाच्या लेपाने ओम गणपतेय नमः हा मंत्र लिहावा आणि त्याच्यावर पाच बुंदीचे लाडू ठेवावे. ते लाडू गणपती मंदिरात दान करावे. असे केल्याने अचानक धन लाभ होण्याची शक्यता निर्माण होते.

६ ) बुधवारी सकाळी स्नान झाल्यावर गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन २१ गुळाचे छोटे छोटे तुकडे अर्पण करावे व त्यावर दुर्वा ठेवाव्या. त्यानंतर थोडा गूळ व तूप घेऊन गाईला खायला घालावे. हा उपाय केल्याने धन संबंधीत अडचणींचे निवारण होते.

७) शास्त्रांमध्ये श्री गणेशाचा अभिषेक करण्याचा पण विधी सांगितलेला आहे. बुधवारी श्री गणेशाचा अभिषेक केल्यास त्याचा विशेष लाभ आपल्याला होतो. हा अभिषेक शुद्ध आणि ताज्या पाण्याने करावा. अथर्व शीर्षाचे पठण करावे. त्यानंतर माव्याचे लाडू नैवैद्याला ठेवून प्रसाद म्हणून वाटावे.

८ ) बुधवारी गणपती मंदिरात जाऊन शक्य असेल त्या वस्तूचे दान करावे. दान केल्याने पुण्य वाढते व श्री गणेशाची कृपा आपल्यावर राहते. जर तुमच्या कुंडलीत बुद्ध गृह अशुभ स्तिथीत असेल तर बुधवारी पूजन केल्याने तोही शांत होतो.

वर दिलेले उपाय एकदा नक्की करून बघा. श्री गणेशाची तुमच्यावर सदैव कृपा राहील.

माहिती आवडली असेल तर नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचे तरी आयुष्य बदलू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!