महिला असो किंवा पुरुष, काही जणांचे वय त्यांच्या चेहऱ्यावरून लक्षात येते. वाढत्या वयोमानानुसार चेहऱ्यावर सुरकुत्या येणे, डोळ्यांखाली काळी वर्तुळे येणे, मुरुमांचे डाग इत्यादी परिणाम चेहऱ्यावर दिसू लागतात. चेहऱ्याशी संबंधित समस्या उद्भवू नये, यासाठी योग्य पद्धतीनं काळजी घेणे आवश्यक आहे. महिलांच्या तुलनेत पुरुषांच्या चेहऱ्यावर वाढत्या वयाचे परिणाम लगेच दिसून येतात. त्वचेची योग्य देखभाल न करणे, वाईट सवयी आणि केमिकलयुक्त प्रोडक्टचा भडीमार यामुळे त्वचेवरील नैसर्गिक तेल आणि चमक नाहीशी होऊ लागते.
ज्यामुळे कमी वयातच वृद्धत्वाची लक्षणे दिसू लागतात. शिवाय वयाच्या तिशीनंतर शारीरिक प्रक्रियांमध्येही बरेच बदल होतात. ज्यामुळे त्वचेमध्ये नवीन पेशींची निर्मिती होण्याची क्षमता कमी होऊ लागते. परिणामी त्वचेमधील कोलेजन आणि प्रोटीन देखील कमी होते. यामुळे वाढत्या वयासोबत त्वचेवर परिणाम दिसू लागतात. त्वचेशी संबंधित उद्भवणाऱ्या समस्यांमुळे तुम्ही देखील त्रस्त आहात का? जाणून घेऊया काही सोप्या स्किन केअर टिप्स.
आपली त्वचा चिरतरूण व आकर्षक राहावी असे प्रत्येका वाटणे साहजिकच आहे. वाढत्या वयात याकडे अधिक लक्ष देण्याची गरज भासते. अशात केमिकल न वापरता काही सवयींमुळे त्वचेची चांगलीच देखरेख करता येऊ शकते-
शक्योत कवळ्या उन्हात बसा ज्याने व्हिटॅमिन्सची कमी भासणार नाही परंतू उगाच कडक उन्हात बाहेर फिरणे टाळा.
बाहेर जाताना एसपीएफयुक्त सनस्क्रीनचा उपयोग नक्की करा. ज्याने टॅनिंगची समस्या जाणवणार नाही.
उन्हात जाणे गरचेजं असल्यास असे कपडे परिधान करा ज्याने जास्त त्वचेचं संरक्षण होऊ शकतेल. सुती कपडे आणि तेही फुल स्लीव्हज असल्यास त्वचेवर अधिक परिणाम होणार नाही.
स्वत:ला आणि त्वचेला न विसरता हायड्रेट करत रहा. अर्थात पाणी पिणे त्यातील भाग आहे. तसेच त्वचेमधील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी नियमित मॉइश्चराइझरचा वापरा.
धूम्रपान आणि मद्यपान सौंदर्यावर दुष्परिणाम टाकतात. अशा सवयी सोडून द्या. त्वचा अजूनच निरोगी आणि तजेलदार दिसेल.
रेटिनोइडचा वापर करा
तुम्ही देखील तिशीच्या आसपास पोहोचले आहात, तर रेटिनोइडचा समावेश असलेल्या प्रोडक्टचा वापर करावा. रेटिनोइड हे रेटिनॉल प्रमाणे कार्य करते. रेटिनोइड हे त्वचेमध्ये नवीन कोलेजन उत्तेजित करण्यास मदत करते. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि डाग दूर होण्यास मदत मिळते.
कोणते क्लींझरवापरताय?
काही जण तेलकट त्वचेमुळे त्रस्त असतात. ही समस्या दूर करण्यासाठी केमिकलयुक्त साबण, फेस वॉश तसंच क्लींझरचा वापर केला जातो. पण यामुळे चेहऱ्यावरील नैसर्गिक तेल आणि मॉइश्चराइझरवर दुष्परिणाम होतात. त्वचा रुक्ष आणि कोरडी होऊ लागते. असे झाल्यास त्वचेशी संबंधित गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्वचा कोरडी झाल्यास चेहऱ्यावरील ग्लो कमी होतो. ज्यामुळे तुम्ही म्हातारे दिसू लागता.
डोळ्यांना लावा क्रीम
डोळ्यांमुळेही आपल्या सौंदर्यामध्ये भर पडते. पण डार्क सर्कलमुळे सौंदर्यामध्ये बाधा निर्माण होते. जर तुमचे वय ३० ते ३५च्या आसपास असेल तर डोळ्यांच्या आसपास तसंच चेहऱ्यावर सुरकुत्या येणं सामान्य बाब आहे. पण ही समस्या दूर करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एखादी क्रीम डोळ्यांच्या आसपासच्या त्वचेवर लावण्यास सुरुवात करा.
दैनंदिन जीवनातील चुकीच्या सवयींमुळेही आपल्या त्वचेवर वाईट परिणाम होत असतात. उदाहरणार्थ मद्य सेवन, सिगारेट ओढणे इत्यादी वाईट सवयींमुळे आपल्या त्वचेचं भरपूर नुकसान होते. अंमली पदार्थांच्या सेवनामुळे केवळ चेहऱ्यावरच नव्हे तर संपूर्ण शरीरावरही नकारात्मक परिणाम होतात. यामुळे गंभीर आजारांचीही लागण होते.
पूर्णझोप घ्या
सुंदर आणि नितळ चेहऱ्यासाठी योग्य प्रमाणात झोप घेणे देखील महत्त्वाचे आहे. नियमित किमान सात ते आठ तासांची झोप घ्यावी. पुरेशा प्रमाणात झोप घेतल्यास आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतात. शारीरिक तसंच मानसिक आरोग्यही चांगलं राहते. महत्त्वाचे म्हणजे तुमची त्वचा तरुण राहण्यास मदत मिळेल. यामुळेच पूर्ण झोप घेणे आवश्यक आहे.