एका मिनटात घोरणे होईल बंद… जबरदस्त घरगुती उपाय…

नमस्कार मित्रांनो,

आयुर्वेदात घोरणे बंद करण्यावर बरेच उपाय आहेत. त्यातलेच काही उपाय आज आपण पाहणार आहोत. पण त्या पूर्वी घोरणे कोणत्या कारणाने होते हे आपण जाणून घ्यायला हवं. घोरण्याची अनेक कारणे आहेत ती आपण जाणून घेऊया.

तुमचे व जन जास्त असेल, दा रु, सि गरेटचे व्यसन तुम्हाला असेल, नोझल पॅसेज म्हणजेच नाकपुड्यांच्या मध्ये जो पडदा आहे त्यात जर जन्मतःच काही दोष असेल, घशातील जी त्वचा आहे जी तर जास्त मऊ असेल, पुरेशी झोप घेत नसाल, फक्त पाठीवरच झोपत असाल उजव्या किंवा डाव्या कुशीवर झोपणे टाळत असाल तर मित्रांनो हि कारणे आहेत ज्यामुळे घोरण्याची समस्या निर्माण होते.

आता या पैकी तुम्ही ठरवा या पैकी कोणत्या सवयी आपल्यामध्ये जास्त आहेत. वज न जास्त असेल तर कमी करण्याचा प्रयत्न करा.

दा रू सि गरेटची सवय हळू हळू कमी करून सोडून देऊ शकता. नाकपुड्यांमधील पडदा जो आहे त्यावर ऑप रेशन शिवाय पर्याय नाही.

घशातील ढिल्ली पडलेली त्वचा जी आहे त्यावर आज आपण उपाय बघणार आहोत. 90 टक्के घोरणे याच कारणामुळे होत असते. त्यावर काय उपाय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत.

आता मित्रांनो घशातील जी त्वचा आपली मऊ किंवा ढिली पडलेली आहे त्यामुळे होत काय कि ज्यावेळी आपण झोपतो त्यावेळी आपण झोपल्यानंतर आपलं शरीर आपल्या घशातील स्नायूंना सैल करत. स्नायू सैल झाल्यामुळे त्यांची साईज वाढते.

आणि परिणामी आपण जेव्हा श्वास घेत असतो श्वास सोडत असतो त्यावेळी हि त्वचा कंप पावते, परिणामी घोरण्याचा आवाज येतो. तर हे एक अतिशय साधं कारण आहे ज्यामुळे घोरण्याची क्रिया होते.

आता जी जास्त मऊ पडलेली त्वचा आहे तिला आपल्याला ठीक करायचं आहे. त्यासाठी आपल्याला दोन पदार्थ घ्यायचे आहेत.

एक म्हणजे देशी गाईचे तूप, देशी गाईचे नसेल तर कोणत्याही गाईचे तूप चालेल. दुसरा पदार्थ म्हणजे हळद.

मित्रांनो पहिल्या दिवशी झोपण्याआधी तुम्हाला अगदी चिमूटभर हळद घ्यायची आहे आणि ती हळद घशात आतून पडजीभ आणि त्याबाजूच्या भागावर हलक्या हाताने लावायची आहे.

लावताना लाळ गळेल ती थुंकून टाकू शकता. काही हळद घशावाटे शरीर गेली तरी त्याचे काही साईड इफेक्ट नाहीत कारण हळद आपल्या रोजच्या वापरातील आहे.

दुसऱ्या दिवशी आपल्याला झोपण्यापूर्वी जे तूप आहे ते एक थेंब उजव्या नाकपुडीत आणि एक थेंब डाव्या नाकपुडीत मान पाठीमागे करून टाकायचं आहे. 5 ते 10 मिनिट तसेच थांबा.

ते तूप पूर्णपणे आत जाऊद्या.अशाप्रकारे तुम्हाला आलटून पालटून हळद आणि तूपाचा प्रयोग सलग 7 दिवस करायचा आहे.

असे केल्याने जी सैल झालेली त्वचा आहे तिचा सैलसर पणा कमी होईल. परिणामी जे कंप निर्माण होतात ती कमी कमी होत जातील आणि शेवटी तुमचं घोरणं बंद होईल. तर मित्रांनो हा प्रयोग तुम्ही करून पहा.

मित्रांनो हे उपाय आवडले असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!