चेहऱ्यावर मुरूमांनी वैतागले, हे सात उपाय बघा करून

तुमच्या चेहऱ्यावर मुरूम आणि पुरळ आहे का? तुम्ही यापासून खूप वैतागले आहात का?  आता निराश होण्याची गरज नाही. कारण आम्ही तुम्हाला असे उपाय सांगणार आहे. ते केल्यास तुम्ही या समस्येपासून कायमची सुटका मिळवू शकाल

१) डायट पूर्णपणे बदला :  मुरूम कंट्रोल करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा आणि पहिला उपाय म्हणजे तुम्ही तुमचे डायट संपूर्णपणे बदलले पाहिजे. तुमच्या डायटमध्ये एक्सपर्टने सांगितलेल्या गोष्टींचे सेवन केले पाहिजे. आहारात मासे, अक्रोड, आळशीच्या बिया तुम्ही रोज खाल्ल्या पाहिजे. त्यामुळे खूप फायदा होता.

२) झोप पूर्ण करा : चेहऱ्यावर पूरळ किंवा मुरूमांची समस्या होऊ नये असे वाटत असेल तर तुमची झोप होणे गरजेचे आहे. चांगला आहार आणि चांगली लाइफ स्टाइल तुमची मुरूमांपासून कायमची सुटका करू शकते.

३) खूप पाणी प्या : तुमच्या त्वचेला चांगले ठेवायचे असेल तर खूप पाणी प्यायले पाहिजे. यामुळे नेहमी त्वचा हायड्रेट राहते आणि शरीरात रक्ताचा फ्लो कायम राहतो. पाण्याशिवाय असे फळ किंवा बाज्या करू शकतात, की ज्यात पाण्याचे प्रमाण अधिक आहे. दिवसात तुम्ही ८ ग्लास पाणी प्यायला पाहिजे.

४) मेवा खा : बदाम, अक्रोड आणि ब्राझील नट्समध्ये सिलीयम असते त्यामुळे त्वचेच्या कोशिका सूजत नाही त्वचेत लवचिकता निर्माण होते.

५) व्हिटामिन ई : मुरूमांमुळे होणारे डाग व्हिटामिन ई युक्त खाद्य पदार्थ खाल्याने नष्ट होता. त्यामुळे अंडी, कडधान्य, मेवा, अनरिफाइंड तेलाचा उपयोग करा.

६) टॉमॅटो खा :  खूप टॉमॅटो खाल्ले पाहिजे, पण ते पिकलेले पाहिजे. टॉमॅटो खाल्ल्याने त्वचेला ग्लो येतो. त्यात खूप सारे एंटीऑक्साडेंट आहे.

७) राजमा : राजमा खाल्याने मुरमांवर लगाम लावला जातो. त्यात झिंक असते. त्यामुळे मुरूम निर्माण होत नाही.

. गुलाबपाणी आणि कापूर यांचे मिश्रण एका बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवून द्या. मुरूम जेव्हा होतील, त्यावेळी कापसाने हे मिश्रण चेहर्‍यावर लावा. हे केल्याने नक्कीच मुरूम कमी होतील.

. संपूर्ण चेहर्‍यावर मुरूम पसरले असतील तर हळद आणि कडुलिंबाची पाने एकत्रित वाटून त्याची पेस्ट तयार करा आणि चेहर्‍यावर लावा. त्याने चेहरा स्वच्छ होईल. कारण लिंबाची पाने रोगप्रतिकारक असतात.

. उन्हाळ्यात त्वचा तेलकट होते. प्रदुषणामुळे चेहरा काळा पडतो व नियमितपणे साफ न झाल्यामुळे मुरूम होतात. चेहर्‍याला स्वच्छ ठेवण्यासाठी बेसनात काकडीचा रस टाकून पेस्ट बनवून चेहर्‍याला लावल्याने चेहरा साफ व स्वच्छ होतो. हे फेस पॅकचे काम करतो.

. मुलतानी माती पाण्यामध्ये टाकून तिची पेस्ट बनवा. नंतर ती चेहर्‍यावर लावा. मुलतानी मातीला दह्यात मिसळूनही लावू शकतो. मुरमांवर हाही एक जालीम उपाय आहे.

. गरम पाण्यात हळद टाकून वाफ घेतल्याने चेहर्‍यावरील छिद्रे खुली होतात आणि चेहरा साफ होतो. मुरूम व्हायला त्यामुळे अटकाव . होतो.

. तुळस व लिंबाच्या पानाची पेस्ट चेहर्‍यावर लावल्याने मुरूम होत नाही.

. पाण्यात चंदनाची पावडर टाकून चेहर्‍याला लावल्यास थंडावा मिळतो व चेहर्‍यावर तेज येते.

. गुलाबाच्या पाकळ्याची पेस्ट बनवून चेहर्‍यावर लावल्याने मुरूम कमी होतात.

. बोलसमच्या फुलांची पेस्ट लावल्याने चेहर्‍यावरचे मुरूम कमी होतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!