मोबाईल चार्ज करताना तुम्ही सुद्धा या 5 चुका करताय का?

नमस्कार मित्रांनो,

बऱ्याचदा असे होते कि काही महिन्यांपूर्वीच घेतलेला नवीन मोबाईल 5 ते 6 महिन्यांनंतर चार्जिंगच्या बाबतीत त्रास देऊ लागतो. चार चार तास मोबाईल चार्जिंगला लावून सुद्धा मोबाईल चार्जिंग होत नाही.

त्यानंतर बॅटरी जरी फुल चार्ज झाली तरी अर्ध्या एक तासात पुन्हा बॅटरी उतरते. त्यानंतर कस्टमर केयर कडे आपण तक्रार केली तरी ते बॅटरी बद्दल कोणतीच गॅरंटी वॉरंटी येत नाही असे सांगतात.

मित्रांनो बॅटरी 3 ते 4 वर्ष टिकायला हवी. पण 5 ते 6 महिन्यातच कशी काय बॅटरी खराब झाली? अश्या कोणत्या चुका आपण केल्या ज्यामुळे बॅटरी खराब झाली किंवा बॅटरी फुगली? बऱ्याचदा मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट झालेला सुद्धा तुम्ही ऐकले असेल.

1) मोबाईल कव्हर

मित्रानो सर्वात पहिली गोष्ट म्हणजे चार्जिंगला ज्यावेळी तुम्ही मोबाईल लावाल त्यावेळी मोबाईलच कव्हर काढून ठेवा. तुम्ही म्हणाल असं का करायचं? याच कारण असं कि या कव्हर मुळे बॅटरीला पुरेशी हवा मिळत नाही. बॅटरीला मिळायला पाहिजे ती हवा हे कव्हर रोखत.

बॅटरीला हवा मिळत नाही परिणामी मोबाईल गरम होऊ लागतो. आणि ज्यावेळी मोबाईल गरम होतो त्यावेळी आपोआपच बॅटरीवर त्याचा निगेटिव्ह परिणाम होतो. बॅटरी लवकर खराब होते.

तसेच तुमचा जो मोबाईल डिस्प्ले आहे तो कालांतराने डल झालेला तुम्हाला दिसतो. म्हणजे जसा नवीन नवीन मोबाईल घेतला तेव्हा जसा डिस्प्ले होता तसा दिसत नाही. मित्रानो तुम्ही कव्हर अवश्य वापर पण चार्जिंग करताना ते काढून ठेवा.

2) कंपनी चार्जर

तुम्हाला जो कंपनी ने चार्जर दिला आहे तोच चार्जर तुम्ही वापरा. तुम्ही जर कोणताही चार्जर वापरू लागलात , उदा. समजा तुमचा रेड मी चा मोबाईल आहे आणि चार्जर सॅमसंग कंपनी चा वापरत असाल तर असे करू नका. या कारणाने सुद्धा बॅटरी लवकर खराब होते.

मित्रांनो प्रत्येक कंपनीचे जे चार्जर आहे त्याचे एमएएच म्हणजेच किती एम्पियर करंट पाठवायचा हे ठरलेलं असत. तर मित्रानो कंपनीचाच चार्जर तुम्ही वापरा. जर तो चार्जर खराब झाला असेल तर दुसरा तुम्ही विकत घेऊ शकता.

बाकी चार्जर च्या तुलनेत कंपनीचा ओरिजनल चार्जर थोडा महाग भेटेल पण एवढे महागाचे मोबाईल आपण घेतो त्यापुढे चार्जरची किंमत कमीच असते. कंपनीच्या ओरिजनल चार्जर मुळे तुमच्या फोन मधील बॅटरीची लाईफ वाढते.

मित्रांनो चायनीज चार्जर तर बिलकुल वापरू नका. चायनीज म्हणजे जे बाजरात 30 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंत मिळतात. असे चार्जर चुकून सुद्धा विकत घेऊ नका.

4) मोबाईल स्विच ऑफ

मित्रांनो जेव्हा पण तुम्ही मोबाईल चार्जिंगला लावता त्यापूर्वी मोबईल नेहमी स्विच ऑफ म्हणजेच बंद करावा. ते शक्य नसेल तर कमीत कमी फ्लाईट मोड वर तरी टाकावा. मित्रांनो जर तुम्ही तसाच मोबाईल चार्जिंगला लावत असाल तर त्यामुळे एका बाजूला चार्जिंग चालू राहते आणि दुसऱ्या बाजूला मोबईलच नेटवर्क चालू राहत.

म्हणजे मोबाईल काम पण करतोय आणि इकडे चार्जिंग सुद्धा चालू आहे. थोडक्यात काय तर तुम्ही जॉब वर जाऊन काम करताय आणि काम करता करता जेवण सुद्धा करताय. तर मित्रांनो हल्ली अर्ध्या अर्ध्या तासातच मोबाईल फुल चार्ज होतात.

अर्ध्या तासासाठी का होईना मोबाईल स्विच ऑफ करा किंवा फ्लाईट मोड वर टाकून मगच चार्जिंग करा.

4) बॅटरी किती टक्के चार्ज असावी?

मोबाईलची बॅटरी किती टक्क्या पर्यंत चार्ज करायची हे बऱ्याच जणांना माहित नसते. बरेच लोक 100 टक्के पर्यंत मोबाईल चार्ज करतात. काही महाभाग तर असे असतात 100 टक्के चार्ज झाल्यानंतर सुद्धा चार्जिंग सुरूच ठेवतात. म्हणतात जास्त चार्जिंग झाली तर लवकर बॅटरी उतरणार नाही.

मित्रांनो हे अत्यंत चुकीचे आहे. अशाने बॅटरी गरम होते, आणि कालांतराने बॅटरी फुगायला सुरवात होते. कंपनी मॅन्युअल मध्ये असे स्पष्ट शब्दात लिहिले असते कि बॅटरी चार्जिंग 90 ते 95 टक्के पर्यंत करा.

जे लोक 95 टक्केच्या वर चार्ज करतात त्यांचे मोबईल लवकर खराब होतात. तर मित्रांनो हि एक काळजी घ्या.

5) लॅपटॉप, डेस्कटॉप कॉम्पुटर

ज्यांच्याकडे लॅपटॉप आहे, डेस्कटॉप कॉम्पुटर आहे ते त्याला यूएसबी केबल जोडतात. आणि मग त्यावर ते मोबाईल चार्ज करतात अगदी 24 तास.

मित्रांनो त्या यूएसबी मधून तुमच्या मोबाईलची चार्जिंग तर सुरु आहे पण जो करंट त्याला मिळतोय जी चार्जिंगची क्षमता एमएएच जे आवश्यक आहे ते अतिशय कमी प्रमाणात मिळते.

त्यामुळे होते काय मोबाईल खूप स्लो चार्ज होतो. थोडक्यात एखाद्या 20 ते 25 वर्ष वयाच्या तरुणाला चमच्याने अन्न भरवण्यासारखं आहे.

मित्रांनो लॅपटॉप मधील काही डेटा मोबाईल मध्ये घेण्यासाठी फक्त याचा वापर करावा. मोबाईल चार्ज करण्यासाठी चुकूनही वापर करू नका.

तर मित्रांनो वर दिलेल्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमच्या मोबाईलची बॅटरी जास्त काळ टिकेल. आणि बॅटरी जर व्यवस्थित राहिली मोबाईल गरम झाला नाही, ओव्हर हिट झाला नाही तर तुमचा मोबाईल तुम्हाला खूप वर्ष चांगली सेवा देणार.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा जेणेकरून तुमच्या मित्र परिवाराला सुद्धा कळावी.

अशाच माहितीपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आमचे मराठी धिंगाणा फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!