अंडरआर्म्सचा काळेपणा कमी करण्यासाठी झटपट करा हे घरगुती उपाय…

अंडरआर्म्स काळेपणा असणं ही एक सामान्य समस्या आहे. सतत येणारा घाम, पर फ्यूम अथवा डि ओ ड्रं ट अंडरआर्म्सवर सहसा डायरेक्ट लावल्यामुळे ही समस्या निर्माण होते.

तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे अंडरआर्म्सला क्री म लाऊन अथवा शेव्ह करून साफ करण्याऐवजी वॅ क्स करणं हा सोपा आणि चांगला उपाय आहे.

कारण हेदेखील काळेपणाचं कारण आहे. पण कितीतरी वेळा अचानक प्लॅ न तयार होतात, त्यावेळी पटकन वॅ क्स करणं शक्य होत नाही.

अशावेळी क्री म अथवा शे व्ह करणं हाच एक उपाय असतो. त्याचाच परिणाम अंडरआर्म्स काळे पडण्यामध्ये होतो.

असे अंडरआर्म्स असतील तर आपल्याला स्ली व्ह लेस कपडे कितीही आवडत असले तरीही ते घालण्याची लाज वाटते.

पण आता तुम्हाला अशी लाज वाटण्याची गरज नाही. कारण आम्ही असे काही झटपट घरगुती उपाय तुम्हाला सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही घरच्या घरीच अंडरआर्म्स स्वच्छ करून त्याचा काळेपणा घालवू शकता आणि तुमचे अंडरआर्म्सदेखील स्वच्छ दिसतील.

उपाय 1

2 चमचे हळद, 1 चमचा बे किं ग सोडा, 3 चमचे मध आणि अर्ध्या लिंबाचा रस एकत्र करून घट्ट पेस्ट करून घ्या. हा एक नैसर्गिक ब्ली चचा प्रकार आहे.

हे मिश्रण तुम्ही साधारण15 से 20 दिवस फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेऊ शकता. हे तुमच्या अंडरआर्म्सना लावण्यापूर्वी तुमचे अंडरआर्म्स वॅ क्स्ड आणि स्वच्छ असायला हवेत.

ही पेस्ट तुम्ही आपल्या बोटांनी काखेत लावा. 20 मिनिटांनंतर हे धुऊन घ्या आणि ओल्या गरम टॉवेलने पुसून घ्या. त्यानंतर त्वचेला नारळाचे तेल अथवा मॉ ई स्च रा ई जर क्रि म लावा.

पहिल्याच वेळी तुम्हाला तुमच्या अंडरआर्म्समध्ये बदल दिसण्यास सुरुवात होईल. असं तुम्ही आठवड्यातून तीन वेळा करू शकता.

उपाय 2

एक वाटीत 1/4 कप साखर, 1 चमचा मीठ, 1 मोठा चमचा मध, 1 मोठा चमचा ऑ लि व्ह ऑ ईल आणि लिंबाच्या रसाचे 3 थेेंब घालून याची एक पेस्ट करून घ्या. आता ही पेस्ट थोडं पाणी लाऊन अंडरआर्म्सला लावा आणि साधारण 3 मिनिटांपर्यंत म साज करा. काही आठवड्यातच तुमच्या अंडरआर्म्समधील काळेपणा निघून जाईल.

उपाय 3

1 चमचा मध आणि 1 मोठा चमचा ऍ पल साय डर व्हि नेगर यासह 2 चमचे दही मिक्स करा. ही पेस्ट थोड्या जाड्या थरामध्ये अंडरआर्म्सच्या त्वचेला लावा. 20 मिनिटांनंतर पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या.

उपाय 4

तुम्हाला माहीत आहे का, बटाटे अंडरआर्म्समधील काळेपणा दूर करण्यासाठी सर्वात स्वस्त आणि सोपा उपाय आहे. तुमच्या त्वचेवर नैस र्गिक ब्ली चप्रमाणे हा बटाटा काम करतो.

बटाट्याचे काप काढून ते त्वचेवर घासा अथवा बटाट्याचा रस काढून तुम्ही अंडरआर्म्सला लाऊन साधारण 15 मिनिट्स तसाच ठेवा. यामुळे काही दिवसातच तुमचे अंडरआर्म्स स्वच्छ दिसू लागतील.

उपाय 5

1/2 चमचा ऑरेंज पील पावडर घ्या आणि त्यामध्ये 2 चमचे दही मिक्स करा. याची एक पातळ पेस्ट बनवा. ही पेस्ट अंडरआर्म्सवर अप्लाय करा आणि 15 मिनिट्स असंच ठेऊन द्या.

नंतर कोमट पाण्याने हा भाग स्वच्छ करा. तुम्हाला काही दिवसातच याचा चांगला परिणाम दिसून येईल.

माहिती आवडली असेल तर तुमच्या मैत्रिणींसोबत नक्की शेयर करा.

अशाच आणखी माहितीपूर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!