चिंच खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का?,

चिंचेचे नुसतं जर नाव काढलं तरी कित्येकांच्या तोंडाला पाणी सुटतं. कोवळ्या तुरट, आंबट चिंचा मीठासोबत खायचा एक वेगळाच अनुभव असतो. ही तोंडाला पाणी आणणारी चिंच आपल्या आरोग्यासाठी किती उपयोगी आहे हे  आपण जाणून घेणार आहोत.

पिकलेली चिंच भूक वाढवते. आंबटगोड अशी चव असणारी चिंच आणि चिंचेचं बी, टरफल यांचे औषधी गुणधर्म आहेत. पिकलेल्या चिंचेचा स्वाद आंबट, गोड आणि तुरट असल्यानं भाजीत किंवा आमटीत वापरल्यानं तोंड स्वच्छ होतं.

शरीराची पचनशक्ती कमी असल्यास चिंच खाणं फायदेशीर ठरतं. चिंचेमधील फाइबर, टार्टेरिक आम्ल आणि पोटेशियम हे घटक पचनशक्ती मजबूत करण्यासाठी कार्य करतात.

रक्ती आव, जुलाब विकारात चिंचोके (चिंचेचे बी) पाण्यात वाटून देतात. चिंचोक्यांपासून चिकटवण्यासाठी खळही बनवतात.

चिंचेचे नियमित सेवन शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढते व मजबूत होते. चिंचेतील ‘क’ जीवनसत्व अनेक रोगांना शरीरापासून दूर करण्यास मदत करते.

चिंचेच्या टरफलापासून चिंचाक्षार बनवतात वेगवेगळ्या वनौषधी आणि या चिंचेच्या क्षारापासून बनवलेल्या शंखवटी नावाच्या गोळ्या पोटदुखीवरचे उत्तम औषध आहे. लिंबू रसाबरोबर या गोळ्या सकाळ, संध्याकाळ 2/2 या प्रमाणात घ्याव्या.

चिंचेचा कोळ, कांदा रस आणि आल्याचा रस एकत्रित दिल्यास ओकारी, जुलाब, पोटदुखी थांबते.

मधुमेहाच्या समस्येवरदेखील चिंच गुणकारी ठरते. चिंचेचे नियमित सेवन केल्याने शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते.

चेच्या नियमित सेवनाने केसांचे आरोग्य सुदृढ राहून केसगळती थांबते. यामुळे केस मजबूत, लांब, दाट आणि काळेभोर होण्यास मदत होते.

चिंचेच्या पाल्‍याच्‍या रसात तुरटी उगाळून त्‍यात कापडाची पटटी भिजवून डोळयावर बांधल्‍यास नेत्रविकार बरा होतो. चिंचेच्‍या कोवळया पानांची चटणी व कोशिंबीर फारच रूचकर लागते. चटणीत चवीला गुळ, हिंग व तिखट किंवा हिरवी मिरची वाटून टाकतात.

पडजीभ आल्‍यास चिंचोका थंड पाण्‍यात उगाळून त्‍याचा लेप करतात. चिंचोका चूर्ण व हळद थंडपाण्‍यात मिसळून घेतल्‍यास गोवर व कांजिण्‍यात आराम पडतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!