भिजवलेले बदाम का खावेत ? काय आहेत त्याचे फायदे… या जाणून घेऊ

नमस्कार मित्रांनो , तुम्ही ऐकले असेल कि रात्री बदाम भिजवत ठेवून सकाळी ते खावेत त्याने स्मरणशक्ती वाढते असे आजवर बऱ्याच जणांकडून ऐकले असेल… पण भिजवलेले बदाम खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढतेच सोबत अजूनही फायदे आहेत जे बऱ्याच लोकांना माहित नाहीत. चला तर मग जाणून घेऊ भिजवलेले बदाम खाण्याचे आरोग्यदायी फायदे.

बदाम हे खूपच आरोग्यवर्धक असतात . भिजवलेले बदाम खाल्ल्याने स्मरणशक्ती तल्लख होते. यामध्ये व्हिटॅमिन ई , कॅल्शियम , झिंग , ओमेगा ३ फॅटी ऍसिड असते. ज्यामुळे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. बदाम भिजवून खाल्ल्याने बदामातील गुणधर्म लवकर शरीरात शोषले जातात. बदामाच्या सालीमध्ये असलेल्या काही एंजाइन्स मुळे त्याचे पचन होते अवघड असते त्यामुळे बदाम रात्री भिजवत ठेवून खावेत.
बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो कि रात्र भर भिजवलेले बदाम सालीसकट खावे कि साल काढून ? तर याच उत्तर आहे साल काढून बदाम खावेत.
बरेच जण बोलतात सालीमध्ये जीवनसत्व असतात मग साल का काढावी ? बदामाची साल पचनास जड असते. बदामाच्या वरची साल हि निसर्गाने बदामाला दिलेले एक कवच आहे. ज्यावेळी बदामाची वाढ होत असते त्यावेळी बाहेरील किडे बदामाच्या आत शिरू नये म्हणून निसर्गानेच बदामाला दिलेले हे कवच आहे.सालीसकट बदाम खाल्ल्याने पचन क्रियेस त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे गॅस सारख्या समस्या उदभवू शकतात.
भिजवलेले बदाम खाण्याचे आरोग्यदायी फायदे 
१ ) भिजवलेले बदाम खाल्ल्याने वजनात घट होण्यास मदत होते. महत्वाचं म्हणजे पचन क्रिया सुधारली जाते त्यामुळे भूकेवर नियंत्रण राहते. लठ्ठपणा वाढण्याचे प्रमुख कारण असलेल्या मेटॅबॉलिक सिंड्रोमवरही नियंत्रण मिळते.
२) गर्भवती स्त्रियांनी भिजवलेले बदाम खाल्ल्याने गर्भाची चांगली वाढ होण्यास मदत होते. बदामातील फॉलिक अ‍ॅसिड गर्भाच्या मेंदूची आणि चेतासंस्थेची वाढ करण्यास मदत करतात.
३ ) ज्यांना रक्तदाबाची समस्या आहे त्यांना भिजवलेले बदाम फारच फायदेशीर आहेत. ‘जर्नल ऑफ फ्री रॅडीकल रिसर्च’ यांच्यानुसार बदामातील ‘अल्फा टेकोफेरॉल्स’ रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी बदाम खाल्ल्यास यामुळे नैसर्गिकरित्या रक्तदाब प्रमाणात राहण्यास मदत होते.
४ ) केसांच्या आरोग्यासाठी देखील डॉक्टर्स रोज बदाम खाण्याचा सल्ला देतात. बदामामध्ये तांब्याचे प्रमाण जास्त असते. जे रक्त शुध्दीकरण करण्यास उपयुक्त आहे.
५ ) बदामांच्या सेवनाने सर्दी आणि पडसे कमी होते. रात्री झोपतांना भिजवलेले बदाम आणि गरम दूध घेतले तर सर्दी कमी होते.
बदामातील अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक शरीरातील कोलेस्ट्रेरॉल कमी करण्यास मदत करतात. यामुळे हृद्यावरील ताण कमी होण्यास मदत होते तसेच हृद्यविकारांपासूनही बचाव होतो. त्यामुळे आहारात बदामांचा समावेश अवश्य करावा.
माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा आणि अशाच माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज मराठी धिंगाणा लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!