नुकत्याच आई झालेल्या असताना तुम्हाला पोटावरील स्ट्रेच मार्क्स बघून, जरी त्यांचा तुमच्या तब्येतीला काहीही त्रास नसला तरी सुद्धा थोडं नाराज व्हायला होतं. तुमच्या स्तनांवर आणि पोटावर प्रामुख्याने दिसत असले तरी काही वेळा ते मांड्या आणि हाताच्या वरच्या बाजूस सुद्धा दिसून येतात. लक्षात ठेवा, कालांतराने हे स्ट्रेच मार्क्स कमी होतात आणि त्यामुळे कायमसाठी कुठलेही नुकसान होत नाही.
गरोदरपणातील स्ट्रेच मार्क्स म्हणजे काय?
गरोदरपणानंतर लांब आणि अरुंद रेषा त्वचेवर दिसू लागतात त्यांना स्ट्रेच मार्क्स असे म्हणतात. गरोदरपणात, जसजशी बाळाची वाढ होते तसे स्त्रीचे वजन साधारणपणे १५ किलो वाढते. पोट, स्तन आणि नितंबाकडील भागात वजन जास्त वाढते त्यामुळे ह्या भागात स्ट्रेच मार्क्स विकसित होतात. पोटावर स्ट्रेच मार्क्स आढळणे सर्वात कॉमन असते. ह्याचे कारण म्हणजे त्वचेच्या वाढीपेक्षा बाळाची वाढ जलद गतीने होते आणि त्वचा ताणली गेल्यामुळे त्या भागातील त्वचा थोडी फाटते. जरी स्ट्रेच मार्क्स मुळे कुठलीही वैद्यकीय समस्या उद्भवत नसली तरी, गरोदरपणात आणि त्यानंतर सौंदर्याच्या दृष्टिकोनातून ते काळजीचे कारण ठरू शकते.
गरोदरपणानंतर स्ट्रेच मार्क्स येण्याची शक्यता
९०% पेक्षा जास्त गरोदर स्त्रियांना पोटावर स्ट्रेच मार्क्स येतात, विशेषकरून तिसऱ्या तिमाहीत ते दिसू लागतात. त्यामुळे निश्चितच तुम्ही एकट्या नाही आहात. गरोदरपणात स्त्रीचे वजन खूप जास्त वाढते (१५-१८ किलो) आणि जर वजन वाढीचा हा दर खूप जास्त असेल तर बाळाच्या ह्या वाढणाऱ्या वजनाशी त्वचा जुळवून घेऊ शकत नाही आणि त्यामुळे स्ट्रेच मार्क्स दिसू लागतात.
काही रिपोर्ट्स नुसार गरोदरपणात किंवा नंतर स्ट्रेच मार्क्स येणे हे आनुवंशिक असते. जर तुमच्या आईला ते असतील तर तुम्हाला ते येण्याची खूप शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही आईला विचारून तुम्हाला ते येऊ शकतात का ह्याबाबतची खात्री करून घेऊ शकता.
तुमच्या त्वचेचा पोत आणि रंग ह्यानुसार स्ट्रेच मार्क्सचा रंग बदलू शकतो. गोऱ्या स्त्रियांना गुलाबी रंगाचे स्ट्रेच मार्क्स विकसित होतात आणि सावळ्या स्त्रियांना त्यांच्या त्वचेच्या रंगापेक्षा थोड्या हलक्या रंगाचे स्ट्रेच मार्क्स दिसू लागतात.
ज्या स्त्रियांचा बीएमआय (बॉडी मास इंडेक्स) जास्त असतो त्यांना कमी बीएमआय असलेल्या स्त्रियांपेक्षा जास्त स्ट्रेच मार्क्स दिसण्याची शक्यता असते.
तथापि, तुम्हाला स्ट्रेच मार्क्स येतील किंवा नाही ह्याविषयी अंदाज बांधणे कठीण आहे. कारण तुम्ही अशा स्त्रियांपैकी एक असू शकता ज्यांना अजिबात स्ट्रेच मार्क्स आलेले नसतात. बऱ्याच स्त्रिया असे सांगतात की त्यांनी स्ट्रेच मार्क्स येऊ नये म्हणून काहीही उपाय केले नसतात तरीही त्यांना हे नैसर्गिकरित्या येणारे स्ट्रेच मार्क्स येत नाहीत.
गरोदरपणानंतर स्ट्रेच मार्क्सची कारणे
शास्त्रीय दृष्ट्या सांगायचे झाले तर आपल्या त्वचेचे तीन थर असतात: हायपोडर्मिस किंवा सबक्युटॅनियस (सर्वात खालचा थर), डर्मिस ( मधला थर) आणि एपिडर्मिस (सर्वात वरचा थर). तुम्हाला दिसत असलेले हे स्ट्रेच मार्क्स हे डर्मिस मध्ये तयार होत असतात. जेव्हा वेगाने त्वचा ताणली जाते तेव्हा त्वचेची लवचिकता तपासली जाते. स्ट्रेच मार्क्स हे गारदारपणात अचानक वजन वाढल्याने किंवा तुमच्या पोटात वाढणाऱ्या बाळामुळे होतात. सर्वात वरच्या थराखाली असलेला डर्मिसचा थर फाटतो आणि त्याखाली असलेला त्वचेचा सर्वात आतील थर दिसू लागतो आणि स्ट्रेच मार्क्स दिसू लागतात.गरोदरपणात तुमचे वजन वाढल्यामुळे त्वचा ताणली गेल्यामुळे स्ट्रेच मार्क्स तयार होतात. लक्षात ठेवा, तुमचे शरीर बाळासाठी जास्तीत जास्त जागा तयार करीत असते आणि त्यामुळे सतत त्वचा ताणली जाते आणि त्यामुळे गरोदरपणात स्ट्रेच मार्क्स तयार होतात.
तुमचे वजन थॊड्या कालावधीत खुप जास्त वाढते, आणि त्यामुळे स्ट्रेच मार्क्स तयार होतात.
तुम्हाला एका पेक्षा जास्त बाळे होणार असतील तर त्यामुळे त्वचा खूप ताणली जाते आणि त्यामुळे स्ट्रेच मार्क्स दिसू लागतात.
तुमच्या बाळाचा आकार जास्त असू शकतो.
तुमच्या त्वचेची लवचिकता कमी होते कारण तुमचे शरीर ह्या नाजूक काळात जास्त प्रमाणात कॉर्टिसोन ह्या संप्रेरकाची निर्मिती करीत असते.
कॉर्टिकोस्टिरॉईड क्रीम्स आणि लोशन्स लावल्याने सुद्धा तुमच्या शरीरावर स्ट्रेच मार्क्स दिसू शकतात. ही अँटी-इन्फ्लमेटोरी औषधे तुमच्या डॉक्टरांनी संधिवात, त्वचाविकार किंवा दमा ह्या आजारांसाठी लिहून दिली असू शकतात.
गरोदरपणात तुमच्या शरीरात होणारे संप्रेरकांच्या बदलांमुळे सुद्धा स्ट्रेच मार्क्स उद्भवू शकतात.
प्रसूतीनंतर स्ट्रेच मार्क्सना प्रतिबंध घालता येऊ शकतो का?
गरोदरपणात योग्य काळजी घेतल्यास स्ट्रेच मार्क्सना आळा घालता येतो. जीवनशैलीमध्ये काही बदल आणि त्वचेच्या काळजावर लक्ष केंद्रित केल्यास स्ट्रेच मार्क्स तयार होण्यास प्रतिबंध घालता येऊ शकतो.
तुम्ही तुमच्या बाळाला चांगले पोषण मिळावे म्हणून चांगला आहार घेत असतानाच त्वचेची लवचिकता वाढेल अशा पदार्थांचा सुद्धा तुमच्या आहारात समावेश करा. अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन इ आणि ए तसेच ओमेगा ३ मुळे स्ट्रेच मार्क्स तयार होत नाहीत. ह्यापैकी काही पदार्थांचा तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करून आहारात समावेश तुम्ही करू शकता: लिंबूवर्गीय फळे जसे की संत्री, पालक, गाजर, रताळे आणि भोपळी मिरची
तुम्ही दिवसातुन कमीत कमी ८ ग्लास पाणी पिऊन स्वतःला सजलीत ठेवा. तुम्ही काकडी, योगर्ट आणि कलिंगड ह्यासारखा पोषक आहार घेऊन सुद्धा स्वतःला सजलीत ठेऊ शकता
गरोदरपणात योगा, स्ट्रेचेस, केगेल सारखे व्यायामप्रकार केल्यास तुमच्या त्वचेची लवचिकता पूर्ववत होईल आणि रक्ताभिसरण सुद्धा सुधारेल
गरोदरपणानंतर स्ट्रेच मार्क्स पासून सुटका कशी करून घ्याल?
बऱ्याच स्त्रियांना शरीरावरचे स्ट्रेच मार्क्स बघून ताण येतो. तर काही स्त्रिया आई झाल्यानंतर झालेला हा बदल आहे म्हणून स्वीकारतात. तथापि, नव्यानेच आई झालेल्या ह्या स्त्रियांना गरोदरपणानंतर , स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी काही उपाय आहे का हा प्रश्न पडतो.अभ्यासाद्वारे असे दिसून आले आहे की, काही काळानंतर हे स्ट्रेच मार्क्स जातात किंवा कमी होतात आणि लक्षात येत नाहीत. जर तुम्हाला गरोदरपणाच्या आधी घालत होते तसे सर्व कपडे घालायचे असतील तर तुम्हाला त्यांच्यापासून सुटका करून घेतली पाहिजे आणि तुमचा आत्मविश्वास पुन्हा मिळवला पाहिजे. बाळाचा जन्म झाल्यानंतर स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी इंटरनेट वर खूप सल्ले आणि टिप्स तुम्हाला मिळू शकतील. स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी खाली काही घरगुती उपाय आणि उपचार दिले आहेत.
गरोदरपणातील स्ट्रेच मार्क्सवर घरगुती उपाय
गरोदरपणामुळे आईच्या शरीरात खूप बदल होतात, वाढलेले वजन आणि तुमच्या शरीराचा बदललेला आकार हे बदल अगदी सामान्य आहेत. गरोदरपणाच्या शेवटच्या तिमाहीमध्ये स्ट्रेच मार्क्स दिसू लागतात तेव्हा तुम्ही आई किंवा आजीला त्यावर उपाय विचारता. आई होणाऱ्या किंवा नुकत्याच आई झालेल्या स्त्रीसाठी स्ट्रेच मार्क्सवर काही घरगुती उपाय आहेत आणि त्यामुळे स्ट्रेच मार्क्स खूप कमी होतात. स्ट्रेच मार्क्ससाठी लोशन तयार करण्याच्या रेसिपींसाठी पुढे वाचा
घरी तयार केलेले मॉइश्चरायझर
तुमच्या त्वचेवर मॉइश्चरायझर लावल्याने तुमची त्वचा मऊ आणि कोमल होण्यास मदत होते आणि त्वचेची लवचिकता पूर्ववत होते. इथे मॉइश्चरायझर घरी तयार करण्याआधी तुमच्या त्वचेचा पोत ओळखणे जरुरीचे आहे. जर तुमची त्वचा कोरडी असेल तर कोरफडीचा गर, ऑलिव्ह ऑइल आणि व्हीट जर्म ऑइल सारख्या प्रमाणात घेऊन मिक्स करा आणि स्ट्रेच मार्क्सवर त्याने मसाज करा. कोको बटर असलेले मॉइश्चरायझर वापरल्याने तुम्हाला कोरड्या त्वचेचा सामना करता येतो. तुमची त्वचा जर तेलकट असेल तर वरील मिश्रण मुलतानी माती सोबत वापरा.
घरी तयार केलेले क्रीम
दोन चमचे बी-वॅक्स, १ टेबलस्पून व्हिटॅमिन इ. तेल आणि अर्धा कप कोको बटर एकत्र करा. त्यामध्ये योग्य प्रमाणात व्हीट जर्म तेल किंवा ऍप्रिकॉट केर्नल तेल घातल्याने मदत होते. बी-वॅक्स संपूर्णपणे वितळेपर्यंत हे मिश्रण उकळून घ्या. हे क्रीम एका बाटलीत ठेवून फ्रिजमध्ये ठेवा आणि दररोज वापरा.
घरी तयार केलेले लोशन
पाव कप कोरफडीचा गर घ्या आणि त्यामध्ये अर्धा कप शुद्ध ऑलिव्ह ऑइल घ्या. त्यामध्ये सहा व्हिटॅमिन इ आणि चार व्हिटॅमिन ए कॅपशूल फोडून टाका. हे नैसर्गिक स्ट्रेच मार्क क्रीम एका काचेच्या भांड्यात किंवा बाटलीत ठेऊन फ्रिज मध्ये ठेवा आणि दररोज मसाज साठी वापरा.
हळद आणि चंदन
गरोदरपणातील स्ट्रेच मार्क्सवर हळद आणि चंदन चांगले काम करतात कारण हळद आणि चंदन वापरल्याने त्वचा उजळते तसेच मऊ होते हे सर्वश्रुत आहे. खरखरीत पृष्ठभागावर थोडे पाणी घालून चंदन उगाळल्यास त्याची पेस्ट मिळते. तसेच ताजी हळद बारीक करून ह्या चंदनाच्या पेस्ट मध्ये मिक्स करून लावा. चांगल्या रिझल्ट्ससाठी पेस्ट वाळू द्या आणि मग धुवून टाका.